#Breaking : नाशिक आगारातून सुटलेल्या बसेसवर दगडफेक

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक आगारातून सुटलेली बसवर उमराने जवळ अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी घडली आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

दरम्यान आज सकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील आगारातून पाच बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यावेळी उपस्थित आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. दरम्यान दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ तीन एसटी बसेस फोडल्याची घटना घडली आहे.

विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीला साठी एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने आज नाशिक आगारातून बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र दुपारनंतर बसेसवर दगड फेक करण्यात आल्याने आता एसटी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.