नवा व्हेरिएंट सरकारसाठी डोकेदुखी, ‘ही’ काळजी घ्या!

नाशिक | प्रतिनिधी
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोन नावाचा नवीन विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा विषाणू घातक असून यावर अद्याप लस नसल्याने सगळ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कळवण विविध कामांच्या भूमीपूजनानिमित्त ते कळवणला बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमीक्रोन या व्हेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतुन विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदार घेत आहे. तसेच यावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

ते पुढे म्हटले की तिसऱ्या लाटेसाठी सरकार सज्ज असून राज्यात लवकरच एक हजार रुग्णवाहिका रस्त्यांवर धावणार आहेत. यासाठी रुग्णालयांना निधी दिला आहे. ते पुढे म्हणाले की नवा विषाणू अधिक घातक असून सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे.

याबाबत काल पुण्यात देखील आढावा घेतला असून आरोगमंत्र्यासह मुख्यमंत्री देखील आढावा घेत आहे. यासाठी आरोग्य विभागाला साडेसात हजार कोटी रुपये दिले असून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.