Home » मोठी बातमी ! साहित्य संमेलन पार पडणार संमेलन अध्यक्षांविना?

मोठी बातमी ! साहित्य संमेलन पार पडणार संमेलन अध्यक्षांविना?

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

आजपासून सुरू होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाला नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जयंती नारळीकर अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे साहित्य संमेलन अध्यक्षांविना पार पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक शहरात आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार असून या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे आहेत. मात्र ऐन सुरू होण्याच्या दिवशी डॉ. नारळीकर हे प्रकृती अस्वास्थामुळे संमेलनाला अनुपस्थित राहणार आहेत. यासोबतच मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ही तब्येत बिघडल्यामुळे गैरहजर राहणार असल्याचे समजते आहे. याबाबत भुजबळ म्हणाले की नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान ओमायक्रोन व्हेरिएंट, बदलते हवामान आणि ढासळलेली प्रकृती या कारणास्तव नाशिक येथे होणाऱ्या संमेलनास उपस्थित राहता येणार नसल्याचे डॉ. नारळीकर यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले. मात्र संमेलनाला ऑनलाईन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!