वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाझे यांचा घातपातच?

नाशिक । प्रतिनिधी

गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए आणि वाजे कुटुंबीयांचा डीएनए एकच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यू प्रकरणाचे यामुळे वाढले आहे.

काही दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत गाडीसह मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती. तत्पूर्वी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीने वाजे यांच्यासंदर्भात मिसिंग तक्रार देखील दाखल केली. होती. यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. मात्र जळालेल्या अवस्थेत आढळली गाडी आणि मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे आता नाशिक पोलिसांच्या तपासानुसार डीएनए एकच असल्याने डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांच्यासोबत घातपात झाल्याचे स्पष्ट झालं आहे. वाजे यांच्या हाडांचा डीएनए अहवाल (DNA Report) नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाझे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे आता वाजेंच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही माहिती दिल्याचे समजते. तसेच डॉ. वाजे यांच्या पतीकडूनही माहिती घेण्यात आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत.