Home » नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार इ – पासपोर्ट

नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार इ – पासपोर्ट

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
नाशिककरांसाठी महत्वाची बातमी असून आता देशभरातील सर्व ई-पासपोर्ट (E-Passport) हे नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (India Security Press) बनणार आहेत. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये चलनी नोटा तयार केल्या जातात. त्यामुळे देशभरात नाशिकचा नोटांचा कारखाना प्रसिद्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता देशभरातील इ पासपोर्ट तयार करण्याची जबाबदारी नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस ला दिलेली आहे.

नुकत्याच देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. आतापर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने चाचणीकरिता २० हजार ई-पासपोर्ट बनवून दिले आहेत.

आता दिवसाला ५० हजार ई-पासपोर्ट बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास २५ ते ३० कोटी पासपोर्ट बनवण्याचे काम इंडिया सिक्युरिटी प्रेसला मिळणार आहे. मार्च महिन्यात हे काम सुरू होईल, अशी माहिती नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!