नाशिक | प्रतिनिधी
नाशकात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर नव्या ओमीक्रॉन व्हेरीएंटचे सावट पसरले आहे. हा व्हेरीएंट करोनाच्या डेल्टापेक्षाही घातक असल्याने प्रशानानाची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान आफ्रिकेत आढळलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. त्याचा प्रभाव साहित्य संमेलनावरही पडत असून यामुळे ५० टक्के उपस्थितांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलमध्ये होत असलेले संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास आल्यावर संमेलनाचे नियोजन करण्यात आले. आहे.
संमेलन अगदी नजीक आल्यावर हा ओमीक्रॉन व्हेरीएंट आढळल्याने राज्यासह देशात टास्कफोर्सच्या बैठका मोठ्या प्रमणात घेतल्या जात आहे. आज (दि.२८) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सूचना दिल्या आहेत
यामुळे संमेलनाच्या आयोजकांनी यावर गांभीर्याने विचार करत पुढील नियोजन सुरू केले आहे. यामध्ये वैद्यकीय समितीने संमेलनात ३८ डॉक्टर आणि ८ हॉस्पिटलचे पथक तैनात केले आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी नर्स, रुग्णवाहिका यांचा समावेश असणार आहे.
मुख्य सभामंडपाच्या आवारात एकूण ३ मेडिकल बूथ उभारण्यात आले असून व्हीआयपी कक्षाच्या मागे एक, प्रवेशद्वारावर दुसरा तर गझल कट्टाच्या मांगे तिसरा बूथ उभारण्यात येणार आहे. मास्क शिवाय कोणालाही प्रवेश नसेल तसेच कुसुमाग्रज नगरीत फिरताना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.