Video : नाशिकच्या पाच मेडिकल मध्ये एकाच वेळी चोरी

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात घरफोडी, दुचाकी चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे आदी प्रकार सातत्याने सुरू असून अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी परिसरातील पाच मेडिकल दुकाने फोडून हजारो रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा प्रकार घडला.

https://youtu.be/W7V5RkF5eCc

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आता चोरट्यांनी मेडिकल दुकानावर आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे व्यावसायिक व व्यापार्‍यांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे.दुचाकी चोरणारे अद्याप पोलिसांच्याहाती लागलेले नाही. त्याचप्रमाणे घरफोड्या करणारेसुद्धा हाती लागलेले नाही. रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने व्यापारीवर्ग हैराण झालेला आहे.

नाशिकरोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच मेडिकलचे दुकाने फोडले. त्यात महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलसमोरील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या तीन मेडिकलमधून चोरट्यांनी रक्कम चोरून नेली.पी. के. आयुर्वेदिक या मेडिकलमधून 18 हजार रुपये रोख, पी.के. हेल्थकेअर मधून दहा हजार रुपये रोख त्याच प्रमाणे नवकार मेडिकल, सागर मेडिकल व आणखी एका मेडिकलमधून चोरट्यांनी काही प्रमाणात रक्कम चोरली असल्याचे समजते.