नाशिक । प्रतिनिधी
नाशिकला खूप थंडी आहे. नाशिक शहर फारच सुंडणार येथील पर्यटन प्रेमात पडायला भाग पाडत अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक शहराच्या थंडी आणि पर्यटनाची स्तुती केली.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गंगापूर डॅमला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी ओपन ट्रॅव्हल बोटीतून मनमुराद सफर केली. नाशिकची थंडी आदित्य ठाकरेंना आवडली, नाशिक हे अप्रतिम शहर आहे असंही ते यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांना नाशिक पर्यटन सुंदर वाटलं. येथील पर्यटनाबाबत लवकरच निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी येथील बोट क्लबचे तोंडभरून कौतुक केले. नाशिकच्या पर्यटन बाबत बोलताना ते म्हणाले कि, नाशिकचे पर्यटन खास आहे. पावसाळ्यात तर अप्रतिम असतंच मात्र थंडीच्या दिवसातही मनाला सुखद अनुभव येथील पर्यटन देतात असते. त्यामुळे लाववकरच नाशिकच्या पर्यटनाला विकसित करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.