Home » आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी?

आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी?

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी

आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याची प्रेसनोट सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र याबाबतीत जितेंद्र भावें शी संपर्क साधला असता पक्षाकडून अधिकृतपणे निलंबनपत्र माझ्यापर्यंत आला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जितेंद्र भावे नाशिकमधील समस्यांवर आपल्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रकाश टाकत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी महिला शिक्षण अधिकाऱ्याला अयोग्य भाषा वापरली होती. यामुळे पक्षाने या संदर्भात माफीही मागितली होती. मात्र पक्षाने थेट हकालपट्टी केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र भावे यांना कार्यध्यक्षपद दिले होते. त्यामुळे प्रचाराची जोरदार तयारी पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र तत्पुर्वी च जितेंद्र भावे यांची हकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जितेंद्र भावे आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून शिक्षण विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले होते. मात्र या लाईव्ह दरम्यान महिला अधिकाऱ्याला आक्षेपार्ह बोलणे त्यांना चांगलेच भोवले आहे. यावर पक्षीय कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!