शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

नाशिकच्या सातपुर अशोकनगर परीसरातील जाधव संकुल येथे एकाने शिवसेना पदाधिकारी श्याम फर्नांडिससह दोघांवर चाॅपरने गंभीर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघा भावांचे वाद सोडवण्यास गेल्या वरून हा हल्ला केल्याची माहिती आहे.

श्याम फर्नांडिस यांना जिल्हा रुग्णालयातुन एका खासगी हाॅस्पिटल मध्ये तर सागर जाधव आणि राजु उगले (गवळी) यांच्यावरही नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असुन तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते,

संशयित संतोष ढमाळ यांस सातपुर पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. घटनेबाबत जिल्हा रुग्णालयात गंभीर जखःमी असलेले श्याम फर्नांडिस यांनी घटनेची माहिती दिलीये…