Home » नराधम बापच उठला लेकीच्या जीवावर..!

नराधम बापच उठला लेकीच्या जीवावर..!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात एक दहा ते बारा वर्षीय मुलीस अज्ञात इसमाने मारण्याच्या इराद्याने फासावर लटकावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. खळबळजनक बाब म्हणजे या मुलीच्या बापानेच तिला मारून टाकण्याच्या उद्देशाने जंगलात आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास देहेरवाडीच्या जंगलात काही गुराख्याना संशयास्पद प्रकार आढळून आला होता. या ठिकाणी एका मुलीस फासावर लटकावण्याचा प्रकार घडत होता. यावेळी गुराख्यानी हा प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र सदर इसम घटनास्थळावरून फरार झाला होता. अखेर पोलिसांनी या इसमास शोधून काढले असून हा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क मुलीचा बापच या घटनेमागे असल्याचे निषपन्न झाले आहे.

घरगुती भांडणातून मुलगी नकोशी झाल्याने जंगलात नेऊन मुलीला संपवण्याचा प्लॅन या बापाने रचला होता. यासाठी दिंडोरी तालुक्यातील देहेरवाडीच्या जंगलात तिला आणले होते. यावेळी फासावर लटकवत असतांना गुराख्यानी पाहिले अन तो प्रयत्न हाणून पाडला. मुलीला तिथेच सोडून या बापाने धूम ठोकली.

याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या मुलीवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बापानेच आपल्या मुलीला जिवंत पणी फाशी देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या 24 तासात नाशिक पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!