आमदारांच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

मागील वर्षी करोनाच्या संकटात नियोजित विकासकामांसाठी निधी मिळाला नव्हता. मात्र यंदाही अशीच परिस्थिती असल्याने निधी मिळतील का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मात्र निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन भुजबळांनी बैठकीत दिले आहे.

आज जिल्हा नियोजन समितीची (Nashik district committee) बैठक पालकमंत्री छगन भुजबळ(chagan bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीची या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजनाबाबत २०२१-२२ अंतर्गत डिसेंबर २०२१ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी ते म्हणाले कि, ९० टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. मार्च आखेर पर्यंत उर्वरीत सर्व निधी खर्च होईल, तसेच आमदारांच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर बैठकीत इतर विषय देखील मंजूर करण्यात आले.

दरम्यान कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीचे प्रतिबिंब जिल्हा नियोजन आराखड्यावर पडल्याचे दिसून आले. कारण पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणायसाठी निधीची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी करोनाच्या संकटात नियोजित विकासकामांसाठी निधी मिळाला नव्हता. मात्र यंदाही अशीच परिस्थिती असल्याने निधी मिळतील का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र निधीमध्ये कमी पडू देणार नाही, असे आश्वासन भुजबळांनी बैठकीत दिले आहे.