नाशिककर ! नववर्षाचे जल्लोषात स्वागत करा, पण..: जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

एकीकडे नव्या वर्षाच्या (New Year Celebration) सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे राज्य सरकारने (State Goverment) नवी नियमावली (New Giudlines) जाहीर केली आहे. मात्र नाशिकमध्ये (Nashik) नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करता येणार आहे.

दरम्यान काल सायंकाळी ओमायक्रोनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवे निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी (Night Curfew) राहणार आहे. तर ख्रिसमस (Christmas) आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र नाशिकमध्ये नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशन करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Nashik Collector Office) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते . ते म्हणाले कि, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिक शहर सज्ज असून नाशिककरांना नववर्षाचा आनंद घेता येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या हॉटेल आणि वायनरी मध्ये येऊन पर्यटक नवीन वर्षांचा स्वागत करू शकतात. मात्र फक्त ५० टक्के उपस्थित ठेवण्यात आली आहे. तसेच ३१ डिसेंबर ला होणाऱ्या कार्यक्रमांवर वेळेचे तूर्त तरी कुठलेली बंधन नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी (Public Place) रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी राहणार असल्याचे सूचित केले आहे.

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा (Corona Crisis) विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. तेच नियम काल मध्यरात्रीपासून नाशिकमध्येही लागू करण्यात आले आहेत.