#Live : केंद्रीय अर्थसंकल्प : निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण; इथे पहा थेट प्रक्षेपण

नवी दिल्ली । प्रतिनिधी

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Union Finance Minister Nirmala Sitharaman) आज आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ (Union Budget 2022) सादर करणार आहेत. थोड्याच वेळात लोकसभेत (Loksabha) या अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात होणार आहे.

दरम्यान यंदाही ‘वही खाता ‘ ऐवजी अर्थसंकल्प टॅब वर वाचला जाणार आहे. सलग दुसऱ्यांदा संसदेत कागदविरहित अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प वाचनापूर्वी त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला प्रोटोकॉलनुसार पोहचल्या आहेत.

https://youtu.be/D4QH_1br-3g

यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले आहे. त्याचा पहिला टप्पा काल ३१ जानेवारीपासून सुरू झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला. चालू आर्थिक वर्षासाठी ९.२ टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला असून पुढील आर्थिक वर्षात तो ८ ते ८. ५ टक्के राहील, असा अंदाज या अहवालामध्ये मांडण्यात आला आहे.

सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे. काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर आज सादर होणार्‍या बजेट कडून सर्वसामान्यांना आशा आहेत. करदाते, शेतकरी, आरोग्य यंत्रणा या बाबत यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्ही डीडी च्या अधिकृत युट्युब चॅनेलला भेट देऊ शकता.