#Breaking : पुढं पोलीस, मागं एसटी, नाशिकच्या डेपोतून पाच बस रस्त्यावर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक आगारातून पोलीस बंदोबस्तात काही एसटी बसेस रवाना झाल्या आहेत. तब्बल वीस दिवसानंतर नाशिकच्ग्या रस्त्यावर वीस दिवसानंतर पहिली बस धावली आहे. एकीकडे बस बाहेर निघत असताना दुसरीकडे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात येत होती.

https://youtu.be/ITyv0hyJ_Fk

राज्यात गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. वेतन वाढ केल्यानंतर एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. एकीकडे काही कर्मचारी संपात सहभागी होत आहेत तर काही कर्मचारी कामावर परतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिक डेपोतून पाच बस प्रवासासाठी काढण्यात आल्या असून यावेळी आंदोलनात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पुढे पोलीस गाडी आणि मागे बस अशा स्थितीत या बस सुटल्या आहेत.

नाशिकमधील एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून अद्यापही यावर ठोस पाऊल उचलले नसल्याने कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे खाजगी वाहतूकदारांची चांगली आवक होत आहे. तर दुसरीकडे संपातून हळूहळू कर्मचारी कमी होत असून अनेकजण कामावर देखील परतत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने या कामगारांना कामावर घेत पोलीस बंदोबस्तात काही बसेस सोडण्यात आल्या आहेत.