Home » सावधान ! लग्नसोहळ्यावर अठरा पथकांची नजर

सावधान ! लग्नसोहळ्यावर अठरा पथकांची नजर

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिका सज्ज झाली असून लग्नसोहळा,लॉन्स वर नजर ठेवण्यासाठी 18 पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने लग्नसोहळे, सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रम करण्यासाठी कोरोना नियमांत शिथिलता करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने खबरदारी म्हणून महापालिकेने कंबर कसली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिकेकडून पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात येणार आहे तर मास्क नसल्यास ५०० रुपये दंड देखील नागरिकांवर आकारण्यात येणार आहे. त्याच बरोबर कोरोनाचाप्रादुर्भाव वाढू नये यासाठी लग्नसोहळा,लॉन्सवर नजर ठेवण्यासाठी अठरा पथक तयार करण्यात येणार आहे.

अठरा पथकांची नियुक्ती सहा विभागात सहा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या प्रत्येकी तीन, असे एकूण अठरा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर व परिसरातील मंगल कार्यालये, लॉन्समधील विवाहसोहळ्यांना अचानक भेटी दिल्या जाणार असून, तेथे तपासणी होणार आहे. तसेच लॉन्स चालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास आधी ०५ हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर त्यानंतर उल्लंघन झाल्यास थेट कार्यालय सील ची कारवाई ही केली जाणार आहे.

जगभरात पसरत असलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट मुळे नाशिकमध्ये देखील प्रशासन हाय अलर्टवर आले आहे. पहिल्या लाटेमध्ये नाशिक शहर हे देशातील सर्वात जास्त कोरोनाचे प्रादुर्भाव असलेल्या टॉप टेन शहरांत समावेश झाला होता. त्यामुळे आता या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा आधी सारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता महापालिकेने कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!