Home » कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवले टेन्शन, प्रशासन अलर्ट

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवले टेन्शन, प्रशासन अलर्ट

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील करोनाच्या ओमिक्रॉन नावाच्या वेरियंटने जगभरात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अनेक देश सतर्क झाले आहेत.

तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील करोनाच्या ओमिक्रॉन नावाच्या वेरियंटने जगभरात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. या नव्या व्हेरिएंटबाबत ठोस पाऊले उचलण्याबाबत चर्चा होणार आहे. मुख्यत्वे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका नजर ठेऊन असणार आहे. याबाबत आज सायंकाळी ५; ३० वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्तही बैठक घेणार आहे. या बैठकीला सर्व कोविड हॉस्पिटलचे डीन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा विचार मुंबई महापालिकेने केला आहे, मात्र विमानसेवा बंद करण्याची कोणतीही मागणी नाही असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेसींग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!