नाशिक महापालिकेचे चार डॉक्टर कोरोनाबधित

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच, आता महापालिकेतील डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य सेवाही काही प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपा रुग्णालये सज्ज असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार डॉक्टर कोरोनाबधित झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकीकडे नाशिकमधील नागरिक कोरोनाबाधित आढळून येत असताना आता डॉक्टरही कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यन नाशिक जिल्ह्यात मागील २४ तासात ५३८ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नव्याने आढळलेल्या ५३८ रुग्णांपैकी ४१९ रूग्ण नाशिक शहरातील असून इतर ग्रामीण भाग, मालेगाव आणि जिल्हाबाह्य रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ८६७ वर गेली आहे.

तर आता मनपातील चार डॉक्टर कोरोना बाधित आढळल्याने खबरदारी म्हणून त्यांनी विलीकरणात ठेवले आहे. असून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.