नाशिककर आठ दिवसात लसीकरण करा, अन्यथा..!

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी आठ दिवसात नागरिकांनी लस घेतली नाहीतर राशन मिळणार नाही, असा इशाराच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. एका दिवसात १०० च्या आत असणारी रुग्णसंख्या आज थेट पाचशेच्या वर येऊन पोहोचली आहे.

ते म्हणाले की, जर येत्या आठ दिवसांत नागरिकांनी लस घेतली नाहीतर राशन मिळणार नाही, त्यामुळे पुढील आठ दिवस नागरिकांना लस घेण्यास वेळ देण्यात येत आहे. सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा राशन मिळणार नाही, अशी तंबी यावेळी भुजबळांनी दिली आहे.

दरम्यान सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना कडक निर्बंध लावण्यात येतील असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत.