नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. एका दिवसात १०० च्या आत असणारी रुग्णसंख्या आज थेट पाचशेच्या वर येऊन पोहोचली आहे.
दरम्यान सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना कडक निर्बंध लावण्यात येतील असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत.
ते म्हणाले की नाशिकसह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अद्यापही नागरिक निर्धास्त होत फिरताना दिसून येत आहेत. यावर आवर घालणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर राखून नागरिकांनी वावरणे आवश्यक असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.