Home » मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट, एसटी तोडफोड प्रकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट, एसटी तोडफोड प्रकरण

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी २००८ मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या वॉरंट नंतर राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

न्यायालयाचे वॉरंट आल्यानंत राज ठाकरे हे न्यायालयात हजर राहणार की वेळ वाढवून मागणार याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांच्या घरीही कोरोना व्हायरस संक्रमित लोक आढळले आहेत. राज ठाकरे यांचे नवे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर चार कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुढील १० दिवसांमध्ये नियोजित असलेले सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. दरम्यानच, परळी कोर्टाकडून राज ठाकरे यांना वॉरंट निघाले आहे.

राज ठाकरे यांनी पाठिमागील महिन्यातच औरंगाबाद दौरा केला होता. त्यांचा हा दौरा एका पदाधिकाऱ्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्यामुळे चांगलाच गाजला होता. दरम्यान, हे पद काढून घेतल्यानंतर दशरथे यांना विचारले असता, आपले पद जरी काढून घेतले असले तरी आपण मनसे आणि राज साहेबंचा सच्चा सैनिक आहे. त्यामुळे पद असो नसो यापुढेही आपण मनसे सोबतच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!