शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमगोव्यातील सराईत गुन्हेगाराच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या

गोव्यातील सराईत गुन्हेगाराच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या

नाशिक । प्रतिनिधी

गोव्यामध्ये दंगल पेटवून पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या सूत्रधाराच्या सारडा सर्कल येथे गुन्हे शाखेच्या युनिट ०१ ने मुसक्या आवळल्या आहेत. येथील हॉटेल एसएमइम्पॅरिअलमधून वास्तव्यास असताना संशयित सुनील नारायण भूमकर(३६, रा. कलंगुट, गोवा) हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याची धरपकड केली आहे.

गोवा शहरात दोन गटांमध्ये दंगल घडवून आणत येथील सामाजिक वातावरणात तणाव निर्माण करून दंगलीचा सूत्रधार सुनील भूमकर फरार झाला होता. उत्तर गोवा गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना शुक्रवारी रात्री उशिरा गोवा पोलिसांकडून भूमकर नाशिक शहरात असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान पांडेय यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांना याबाबत आदेशित करत गुन्हे शाखा युनिट ०१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सापळा रचण्यास अंगितले. ढमाळ यांनी साहाय्यक निरीक्षक खैरनार, उपनिरीक्षक उगले यांचे पथक तयार करून गोवा गुन्हे शाखेच्या पथकासोबत शोध मोहीम सुरु केली.

द्वारका, जुने नाशिक या भागातील विविध हॉटेल्स, लॉजची झाडाझडती घेतली. या दोन्ही पथकांनी सापळा रचला. सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित भूमकर हा हॉटेलमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले. यावेळी भूमकर याने पोलिसांसोबत झटापट करत निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यास चांगलेच कोंडीत ठेवत जेरबंद केले.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप