Video : ‘असे’ फोडले जात होते देशातील महत्वाचे पेपर

नाशिक | प्रतिनिधी

एकीकडे विद्यार्थी अहोरात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र अशा परीक्षांचे पेपरच फोडण्यात येत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अशा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

देशभरात होणाऱ्या वेगवगेळ्या परीक्षांचे पेपर फोडून त्यांची लाखो रुपयांना विक्री करणारी एक टोळी देशपातळीवर काम करत असल्याचे उघड झाले असून याच टोळीने ३१ ऑकटोबरला झालेला आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. यासोबत रायगड पोलीस भरती, देशभर होणारी सैन्य भरतीचा पेपरही फोडल्याचे आर्मी इंटेलिजन्सनी केलेल्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

https://youtu.be/tkUpDShNk_M

गेल्या काही वर्षांपासून पेपर फुटीच्या अनेक प्रकरणे समोर येताना दिसुन येतात. यातील काहीजण पकडले जातात तर काहीजण या घोळात असून यशस्वी रित्या बाहेर पडतात. देशभरात पेपवरफुटीच्या एकूण प्रकरणांचा विचार केला तर यातील आर्थिक उलाढाल किती असेल याची कल्पना करवत नाही. अनेक प्रकरण समोर येतात तर काही प्रकरणे दाबून टाकण्यात येतात. यामुळे प्रामाणिक पणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र यातून पाहायला मिळते.

आरोग्य भरती, सैन्य भरती ही प्रकरणे उघडकीस आल्याने पोलिसांनी यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र यासारखी अनेक प्रकरणे पुराव्याअभावी दडून जातात. वरील प्रकरणात पकडलेल्या संशयितांमध्ये आर्मीतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. त्यामुळे पेपर फोडणारी टोळी किती खोलवर गेलेली आहे हे दिसून येईल.

परीक्षेच्या कालावधीत पेपरफुटीच्या घटना प्रकर्षाने समोर येतात. त्यावेळी त्रास हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतो. तसेच पेपर परत होणार का? असा चिंताजनक विचारही मनात डोकावतो. एकूणच अशा घटनांना किंवा पेपर फोडणाऱ्या टोळक्यांचे बिंग फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.