नाशिकसह जिल्ह्यात ‘टीप टीप बरसा पानी’

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान केरळच्या किनारपट्टीपासून ४५० किलोमीटर अंतरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामुळे राज्यातील काही भागांत सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्येही आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडतो आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलकी टिपटिप सुरू झाली आहे.

आज सकाळपासूनच वातावरण पूर्णतः ढगाळ राहून असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज संध्याकाळपासून ते गुरुवार सकाळ पर्यंत नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान या रिपरिप पावसामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.