मोठी बातमी ! संमेलनावर भाजपचा बहिष्कार?

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या साहित्य संमेलनातील मानापमान नाट्य काही संपायच नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आता महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलन आयोजकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

अवघ्या एक दिवसांवर साहित्य संमेलन आले असताना अद्यापही वाद सुरूच आहेत. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजकांची कान उघडणी केली आहे. संमेलनापासून भाजपच्या नेत्याने दूर ठेवले जात असल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान संमेलनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या ग्रंथ दिंडीलाच महापौर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संमेलनातील मानापमान नाट्य अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.