जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे गट वाढणार.. ?

येवला प्रतिनिधी : पांडुरंग शेळके

जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण या थंडीत चांगलेच तापले आहे कार्यकर्ते नेत्यांच्या मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी सुरू झाले आहेत प्रत्येक जण आपल्याला सुरक्षित मतदारसंघ शोधत आहे आरक्षणाची चित्र स्पष्ट झाल्यावर यापेक्षा अधिक वातावरण येणाऱ्या काळात बदलताना दिसेल त्यातच प्रशासन पातळीवर नासिक जिल्हा परिषदेचे बारा गट वाढणार असून सदस्य संख्या 85 होणार असल्याचे समजते सध्या स्थितीला जिल्हा परिषदेत 73 सदस्य आहेत जिल्ह्यातील तालुक्यांमधील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन जवळपास आठ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे गट वाढणार आहे यामध्ये निफाड तालुक्यात 2 तर नाशिक, येवला,

नांदगाव, चांदवड सिन्नर,मालेगाव,दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढण्याची चर्चा चालू आहेत जिल्हा प्रशासनाने या संदर्भात चाचपणी सुरू केली आहे त्यात सुरगाणा व कळवण या तालुक्यांमध्ये देखील दोन गट वाढणार असल्याचे समजले जात आहे त्याच बरोबर नाशिक महानगरपालिकेत देखील नगरसेवकांची संख्या नाशिक शहराच्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 122 वरून 133 झाली आहे त्यापाठोपाठ नाशिक जिल्हा परिषद गट संख्या 73 आहे बारा ने वाढून सदस्य संख्या 85 होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे कोणत्या तालुक्यात कुठला गट वाढतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.