धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे ग्रामसेवक बनला चैन स्नॅचर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्याला सोनसाखळी चोरी नवीन नाही. अनेक ठिकाणी चैन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र यामध्ये सुशिक्षित तरुण देखील आता सोनसाखळी चोरी करतांना पकडले जात आहे.

असाच एक प्रकार चांदवड तालुक्यात घडला असून येथील ग्रामसेवकच सोनसाखळी चोर निघाला आहे. या ग्रामसेवकाने तीन चार सोनसाखळी चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चैन स्नॅचिंगचा हा प्रकार थोडा धक्कादायकच आहे.

चांदवड तालुक्यातील एका ग्रामसेवकाला चैन स्नॅचिंग प्रकरणात नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबतच या ग्रामसेवकाकडून एक नाही दोन नाही तर पाच चैन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता कर्ज फेडण्यासाठी हा गुन्हेगार चैन स्नॅचिंग करत असल्याची नाशिक पोलिसांनी दिली आहे.