नाशिकमध्ये ‘काश्मीर फाईल्स’चे हटके प्रोमोशन

नाशिक । प्रतिनिधी
बहुचर्चित द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने अल्पावधीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर देशभरात या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील तरुण देखील या चित्रपट पाहावा यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाचे हटके प्रोमोशन नाशिकमधील तरुणांनी केले आहे. शहरातील डोंगरे वसतिगृह येथील सिग्नल वर हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते.

‘हमें लगता है कि ऐसी घटनाओकी पुनरावृत्ती, हमारे देश में कभी ना हो.. सभी से विंनंती हैं , अभि भी समय हैं, जाओ देखके आओ..!’, ‘हम देखेंगे, हम देखेंगे, १९ जनवरी १९९० की घटनाओ कि सच्चाई हम जानेंगे, हम जानेंगे .. ३२ साल छुपाये हुए भारत के काश्मीर कि सच्चाई…!, असे फलक घेऊन हे तरुण हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. काही नागरिक तर चित्रपट पाहण्यासाठी येण्याचे आश्वासनही या तरुणांना देत होते.

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची मोठया प्रमाणावर चर्चा आहे. ज्वलंत विषयाची मांडणी करुन अग्निहोत्री यांच्या (Bollywood Movies) या चित्रपटानं लक्ष वेधून घेतलं आहे. काश्मिर पंडितांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचार हा विषय केंद्रस्थानी ठेवून (Bollywood News) त्याची प्रभावी सादरीकरण अग्निहोत्री यांनी केली आहे.