भारतीय पोस्टच्या महाराष्ट्र सर्कलचा निकाल जाहीर; असा पहा निकाल?

नाशिक । प्रतिनिधी

भारतीय पोस्ट (India Post) कडून ग्रामीण डाक सेवक नोकरभरती परीक्षा 2021 (Gramin Dak Sevak Recruitment Exam) चा महाराष्ट्र आणि बिहार सर्कलचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांना आपला निकाल ऑनलाईन अधिकृत वेबसाईट appost.in वर तपासता येणार आहे. ऑनलाईन निकाल पीडीएफ स्वरूपात जाहीर करताना उमेदवारांचे रजिस्ट्रेशन नंबर, त्यांनी मिळवलेली टक्केवारी, डिव्हिजन, पोस्ट नेम आणि बाकी तपशील देण्यात आले आहेत.

भारतीय पोस्ट ची अधिकृत वेबसाईट appost.in ला भेट द्या. त्यानंतर रिझल्ट टॅब मध्ये तुम्हांला ज्या सर्कलचा निकाल पहायचा आहे तो बिहार / महाराष्ट्र सर्कल निवडा. आता एक पीडीएफ फाईल डाऊनलोड होईल. तुमच्याकडे पीडीएफ फाईल डाऊनलोड झाली की निकाल पाहता येऊ शकतो.

दरम्यान उमेदवारांच्या उच्च शिक्षणाच्या पात्रता निकषावरून नव्हे तर निकालावरून आपोआप तयार झालेल्या मेरीट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. महाराष्ट्रात पोस्टाच्या या भरतीद्वारे महाराष्ट्र टपाल विभागात 2428 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1105, आर्थिक दुर्बल घटकासाठी 246, ओबीसीसाठी 565, अनुसूचित जातीसाठी191, अनुसूचित जमातीसाठी 244 आणि पीएच प्रवर्गासाठी 77 जागा आहेत.