Home » महिला वनरक्षकास मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

महिला वनरक्षकास मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

सातारा (Satara) जिल्ह्यातील मान (Man Tehsil) तालुक्यात असलेल्या पळसावडे (Palsavade) गावातील महिला वनरक्षकास माजी सरपंचाकडून झालेल्या मारहाणीची दखल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही घेतली आहे. या प्रकरणातील ‘आरोपीला आज सकाळीच अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल’ अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच ‘महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत’, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पळसावडे गावातील हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटीझन्सकडून घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, प्राप्त तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी रामचंद्र जानकर हा पळसवडे गावचा माजी सरपंच आहे व वनसमितीचे अध्यक्ष आहे.’ रामचंद्र जानकर व त्याची पत्नी प्रतिभा यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार वनरक्षक सिंधू सानप यांनी दिली होती.

सिंधू सानप व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे हे दोघेही वनरक्षक आहेत. दरम्यान, कर्तव्य बजावताना अडथळा आणत सरपंच व वनसमितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीने मारहाण केल्याची तक्रार सानप यांनी केली होती. सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, एका महिलेला एक पुरुष आणि आणखी एक महिला अमानुष मारहाण करत आहेत. आजुबाजूचे लोक मारहाणीची ही घटना पाहात आहेत. तर, काही लोक या प्रकाराचे शुटींगही करत आहेत. या व्हिडिओत दिसणारा पुरुष हाच माजी सरपंच रामचंद्र जानकर असल्याचा आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!