नाशिक । प्रतिनिधी
खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा घटनेतील संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.दि. १९ रोजी सातपूरच्या अशोक नगर परीसरात एका तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.
नाशिकच्या सातपूर भागात एका भाजीविक्रेत्या तरुणाने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती..निलेश सोनवणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी सदर सावकाराविरुद्ध सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आज या संशयिताच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
या संपूर्ण प्रकरणी मयत सोनवणे यांचा घरावर करता धरता माणूस गेल्याने मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर संशयित आरोपीला कठोरतील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निलेश सोनवणे च्या कुटुंबीयांनी केली आहे. या बाबत अधिक तपास सातपूर पोलीस करत आहे.