Home » आपण कोणाचीही पतंग काटत नाही!

आपण कोणाचीही पतंग काटत नाही!

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
येवला शहरात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला तर कोरोनाचे नियम नागरिकांनी पाळून काळजी घेणं गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हंटले.

दरवर्षी मकर संक्रांत या सणाला येवला येथे मोठ्या प्रमाणावर पतंगावोत्सव साजरा केला जातो. यंदा देखील मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या सावटामुळे यंदा या उत्सवाची रंगत कमी असली तरीदेखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंगोत्सवाचा आनंद घेत ढील दिला. तर याप्रसंगी मी कुणाचीही पतंग काटत नसल्याचे भुजबळ यांनी सांगत विरोधकांना टोला देखील लगावला.

करोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला.तर उत्सव साजरा करत असतांना नागरिकांनी करोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी देखील त्यांनी केले.

दरम्यान जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार,वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर आदी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!