अखेर ‘त्या’ वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची माफी

नाशिक | प्रतिनिधी
जळगाव येथील वादग्रस्त वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कार्यक्रमात त्यांनी ‘त्या’ वक्तव्यावर आपले मौन सोडले आहे.

दरम्यान जळगाव येथील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांना टोला दिला होता. मात्र याच वक्तव्यावरून ते अडचणीत आले होते.

याबाबत महिला आयोगाने पाटील यांना माफी मागा अन्यथा अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता गुलाबराव पाटलांनी साक्री येथे या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे

ते म्हणाले की, भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असे यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.