हेमा मालिनी संदर्भांतील ‘ते’ वक्तव्य पाटलांना भोवणार

नाशिक | प्रतिनिधी

मंत्री गुलाबराव पाटील जळगाव च्या कार्यक्रमातील वक्तव्य चांगलेच भोवले आहे. गुलाबराव पाटलांनी माफी मागावी अन्यथा करण्यात येईल असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला आहे.

दरम्यान जळगाव येथील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. त्यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले होते की, माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांना टोला दिला होता.

याच वक्तव्यावरून आता ते अडचणीत आले आहेत. त्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली असून कुठल्याही विकासकामांची तुलना महिलेच्या रूपरेषेशी करू नये अत्यंत तुच्छ पद्धतीचं हे वक्तव्य आहे, असल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे.

त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला आहे.