Home » गोदास्पंदन लॅण्डस्केप स्पर्धेत कोल्हापूरचा रंग बहरला!

गोदास्पंदन लॅण्डस्केप स्पर्धेत कोल्हापूरचा रंग बहरला!

दोन दिवस भव्य प्रदर्शन, भेट देण्याचे आवाहन

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
शहराचा समृध्द वारसा सांस्कृतिक अंगाने विकसित करण्याच्या उद्देशाने बांधकाम क्षेत्रातील पाटील समुहाच्या प्रस्तावित गोदास्पंदन या विलोभनीय गृहप्रकल्पानजिक आयोजित करण्यात आलेल्या गोदास्पंदन लॅण्डस्केप कॉन्टेस्ट अर्थात शीघ्ररूपी चित्रकला स्पर्धेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून प्रथम क्रमांकाचे रू. ५१ हजारांचे पारितोषिक कोल्हापूरच्या हर्षवर्धन देवतळे यांनी पटकावले आहे.

दरम्यान, या चार दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी राज्यभरातील चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृतींचे उद्या दि. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी प्रकल्पस्थळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेदरम्यान आयोजित या प्रदर्शनाचा नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

पंधरा वर्षांवरील चित्रकार स्पर्धकांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातील चित्रकार कोविड नियमांच्या अधीन राहून मोठ्या संख्येने सहभागी झाले. तब्बल चार दिवस स्पर्धकांनी प्रकल्पस्थळी गर्दी केली होती. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेचे कला क्षेत्रातील जाणकारांकडून त्रयस्थ आणि नि:पक्ष पध्दतीने परीक्षण करण्यात येऊन विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!