Home » अखेर संमेलनस्थळाच्या अँम्पी थेटरला ‘स्वातंत्रवीर सावरकरांचे’ नाव

अखेर संमेलनस्थळाच्या अँम्पी थेटरला ‘स्वातंत्रवीर सावरकरांचे’ नाव

वाढत्या रोषानंतर आयोजकांना उपरती

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
अखेर मनसेच्या मागणीला यश आले असून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनस्थळी निर्मित केलेल्या एमपी थेटरला ‘स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर’ यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबत मनसे शिष्टमंडळाची मागणी स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मान्य केली आहे.

यंदाचे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. आणि त्यातच नाशिक आणि विनायक दामोदर सावरकर हे अजोड नाते आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी सारस्वतांचा मेळावा भरणार आहे. तेथील साहित्यनगरीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकरनगरी’ अथवा व्यासपीठाला ‘स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी मनसे तर्फ़े तसेच नाशिक मधील इतर संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन पालकमंत्री भुजबळ, अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासह जयप्रकाश जातेगावकर आणि संजय करंजकर यांना देण्यात आले.

दरम्यान आज पालकमंत्री भुजबळ यांनी ही मागणी मान्य केली असून साहित्य संमेलनाच्या संमेलनस्थळी निर्मित केलेल्या एमपी थेटरला ‘स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर’ यांचे नाव देण्यात येणार आहे. या मान्यतेनंतर मनसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. याप्रसंगी मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,साहित्य संमेलनाचे निमंत्रक,मुख्य कार्यवाह श्री.जयप्रकाश जातेगावकर,मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड आदि उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!