आरोपीला पळवून लावण्यात पोलिसांचा हात

नाशिक । प्रतिनिधी
इघे खून प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमल्याने गोंधळ निर्माण झाला. मात्र पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड करताच कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सातपूर परिसरात सकाळी झालेल्या खुनानंतर वातावरण चिघळले असून नाशिक भाजपा पदाधिकऱ्यासंह परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यानंतर सातपूर पोलीस ठाण्यासमोर परिसरातील कार्यकर्त्यासंह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी पोलिसांना गर्दी थोपवण्यासाठी धरपकड करावी लागली. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीस पाठीशी घालत असल्याचा आरोप पोलिसांवर केला. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान नाशकात खुनाचे सत्र सुरूच असून आज झालेल्या खुनाच्या घटनेनंतर वातावरण चिघळले असून आता नाशिक पोलीस यावर काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.