मालेगावात ‘हिजाब डे’ला परवानगी नाकारली!

नाशिक । प्रतिनिधी

पोलिसांची परवानगी नसताना जमियत उलेमा तर्फे हिजाबप्रश्नी महिला मेळावा घेतल्याप्रकरणी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखवलं करण्यात आला होता. मात्र आज पुन्हा मालेगाव येथे हिजाबला समर्थन देण्यासाठी मुस्लिम महिला हिजाब परिधान करून एकत्र येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला देखील पोलिसांनी परवानगी नाकारली असून महिला एकत्र येणार का नाही याकडे लक्ष लागले आहे.

कर्नाटकात हिजाबला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर येथील अजीज अल्लू मैदानावर हजारो मुस्लिम महिलांनी एकत्र येत हिजाब परिधान करीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मुस्लीम महिलांनी एकत्र येत महिला मेळावा घेतल्याप्रकरणी पवार वाडी पोलिसांत काल (दि.१०) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान आज पुन्हा हिजाब ला समर्थन देण्यासाठी मुस्लिम महिला हिजाब परिधान करून एकत्र येणार असून हिजाब डे साजरा करण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमाला देखील मालेगाव पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. येथील परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने महिला एकत्र येणार का नाही याकडे लक्ष लागले आहे.

कर्नाटकात हिजाबप्रश्नी झालेल्या घटनेनंतर राज्यभर समर्थनार्थ व विरोधात आंदोलन केली जात आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर मालेगाव येथील वातावरण तापले आहे. आज अकरा वाजता या महिला हिजाब घालून कर्नाटकात घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.