राज्यातील लसीकरणात उत्तर महाराष्ट्र पिछाडीवर

नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही लसीकरण मात्र सुरूच आहे. तसेच अद्यापही राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र राज्यातील लसीकरणात उत्तर महाराष्ट्र पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे महाराष्ट्र राज्य लसीकरणाबाबत (Vaccination) देशात प्रथम क्रमांकावर असताना आता राज्यात उत्तर महाराष्ट्र मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये ठाणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर, नाशिक दुसऱ्या क्रमांकावर,जळगाव तिसऱ्या क्रमांकावर,नांदेड चौथ्या तर अहमदनगर पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात लसीकरणाला वेग प्राप्त व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी भरपूर प्रयत्न करीत आहते. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढते आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्याने मोठी मजल मारली असून जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. मात्र अद्यापही अनेक नागरिकांनी लास घेतली नसल्याचे समोर आले आहे. मात्र दिवसेंदिवस लसीकरणावर भर देण्यात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

पहिल्या पाच च्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांचा समावेश असून उत्तर महाराष्ट्रातील या तीनही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे राज्यातील लसीकरणात उत्तर महाराष्ट्र पिछाडीवर आहे. दरम्यान लसीकरणात पिछाडीवर असलेल्या या तीन जिल्ह्यांमध्ये निर्बंधही शिथिल होत नसल्याचे समोर आले आहे.