नाशिक | प्रतिनिधी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह सहा जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून हा पुरस्कार दिला जातो. यंदाही या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सहा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, अतुल पेठे, मंत्री डॉ. राजेश टोपे, प्रा.डॉ.हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, सीताबाई घारे, पंडित सुरेश तळवलकर या सहा जणांना यंदाचे पुरस्कार घोषित झाले आहे.
या पुरस्कारार्थींना २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराचे स्वरुप आहे. १० मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.