शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमघरकाम करणाऱ्या महिलेचा दहा लाखांवर डल्ला!

घरकाम करणाऱ्या महिलेचा दहा लाखांवर डल्ला!

नाशिक । प्रतिनिधी
घरकाम करणाऱ्या मोलकरणीने घर मालकिणीचे लक्ष विचलित करून वेळोवेळी सुमारे ११ लाख रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हि घटना शहरातील पंडित कॉलनी येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार वैशाली जैन या पंडित कॉलनी येथे राहतात. येथील त्यांच्या बंगल्यात किरण साळवे नामक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. किरण साळवे या महिलेने घरातील काम करता करता वैशाली जैन यांचा विश्वास संपादन केला. दि. २१ डिसेंबर २०२१ ते ०३ फेब्रु. २०२२ या काळात बंगल्यात काम करीत असताना या घरकाम महिलेने वेळोवेळी बंगल्यातून पैसे चोरले.

दरम्यान या घटनेची माहिती जैन यांना मिळाली. रस्ताही जैन यांनी साळवे यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. या काळात या महिलेने सुमारे दहा लाख ९४ हजार रुपयांची चोरी केल्याचे समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसांनी महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप