नाशिककरांनो तुमच्या घराचे स्वप्न महागले!

नाशिक | प्रतिनिधी
बांधकाम साहित्य दारात वाढ झाल्याने नाशिककरांच्या घराचे स्वप्न महागले आहे. घरांच्या किंमतीत प्रति चौरस फूट ४०० ते ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. नुकतीच बांधकाम विकसकांची संघटना असलेल्या नरेडकोने (नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल) नाशिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता नाशिकमध्ये घर घेणे जिकिरीचे होणार आहे.

दरम्यान लोखंडाच्या दरात तब्बल ११० टक्के पीव्हीसी पाईप शंभर टक्के सिमेंटच्या दरात तर ४० टक्के तर ॲल्युमिनियम व इतर साहित्यात ४० ते ७० टक्के दरवाढ झाल्याने तसेच इतर साहित्य व मजुरी महागल्याने बांधकाम प्रकल्पांचा खर्च नियोजन बाहेर गेला आहे. या वाढीव खर्चामुळे प्रति चौरस फूट घरांचे दर चारशे रुपये पर्यंत वाढवण्याचा निर्णय नरेडकोने पत्रकार परिषदेत जाहीर केला.

बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक कोंडी ची माहिती देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी केड्राईने पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर मंगळवारी नरेंद्र कोणे पत्रकार परिषदेत संभाव्य दरवाढीची माहिती दिली. यामुळे बांधकाम प्रकल्प खर्चामध्ये ४५ ते ५० टक्के वाढ झाल्याने या दरवाढीचा बांधकाम व्यावसायिक व घेणारे नागरिक दोघांना आर्थिक फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोविड नंतर बांधकाम व्यवसाय स्थिरावत असताना बांधकाम साहित्याच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने स्टील, पीव्हीसी पाईप, अल्युमिनियम, सिमेंट, कोपर मेटल, तसेच लेबर चार्जमध्येही अशी वाढ झाल्याने बांधकाम व्यवसायिक यांचे आर्थिक गणित पूर्णत कोलमडले आहे.

केंद्रीय स्तरावर याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास बांधकाम क्षेत्राची वाढ होणार असून सर्वसामान्य नागरिकांचे गृहस्वप्न साकार होते होणे कठीण आहे.

अशी होणार दरवाढ

मजले इमारतउंची वाढणारे दर (प्रति. चौ.फूट)

०४ १५ मीटर ३००
०७ २४ मीटर ५००
१५ ४५ मीटर ६००
२२ ७० मीटर ७०० ते ८००