Home » बायको फारकत घेणार असल्याने पतीने मारली गोदावरीत उडी

बायको फारकत घेणार असल्याने पतीने मारली गोदावरीत उडी

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नवरा बायको म्हटलं कि भांडण आलंच, मात्र भांडणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. बायको फारकत घेणार म्हणून नवऱ्याने गंगेत उडी मारल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. दीपक अशोक परदेशी (वय ३०, रा. लेखानगर, सिडको) असे संबंधित नवऱ्याचे नाव आहे. यावेळी अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत दिपकचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. शेवटी अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली.

अधिक महिती अशी दीपक परदेशी आणि कोमल परदेशी हे दोघेही लेखानगर परिसरात राहतात. अनेकवेळा दोघांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे दिपकची पत्नी थेट फारकत घेण्याचे सांगत होती. फारकत घेण्यावरून त्यांच्यात न्यायालयात वाद सुरू होते. दरम्यान या विषयावार बोलण्यासाठी दिपकने कोमलला रामवाडी पुलावर येण्यास सांगितले. यावेळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने दीपकने शेवटी रागारागात गोदावरी नदीपात्रात उडी मारली.

दीपकने उडी मारल्याचे पाहताच बायको कोमलने आरडा-ओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. काही नागरिकांनी पंचवटी अग्निशमन केंद्राला घटनेची माहिती कळवल्यानंतर पथक तातडीने घटनास्थळावर पोहचले. बोटीच्या सहाय्याने दीपक परदेशी यांचा शोध सुरू केला. शेवटी अंधार पडल्यामुळे हे शोधकार्य थांबण्यात आले. याप्रकरणी कोमल परदेशी यांनी मालेगाव स्टँड पोलीस चौकीत जाऊन सारा प्रकार सांगितला.

दरम्यान आजही अग्निशामन दलाच्या वतीने गोदावरी नदीपात्रात दिपकचा शोध गेहताला जात आहे. तर दिपकच्या मित्रांनी दीपकला पोहता येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे दीपकने रागाच्या भरात गोदापात्रात उडी मारली असेल. कुठल्याही तरी बाजूने पोहत जाऊन बाहेर पडले असतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!