चुंचाळे परिसरात पतीकडून पत्नीचा गळा चिरत खून.

नाशिक : नाशिक पत्नीचा गळा चिरून हत्या करून पती फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबड शिवारातील चुंचाळे येथे उघडकीस आला आहे.संगीता सचिन पवार वय २५ असे या खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
फरार पती हा औरंगाबाद वाळुंज पोलिस ठाण्यात स्वतः हजर होऊन त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे.अंबडच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अंबड चुंचाळे शिवारात सचिन अशोक पवार मूळ राहणार खिर्डी ता.खुलताबाद औरंगाबाद हा पत्नी संगीता सोबत चार दिवसांपूर्वी राहण्यास आला होता. रात्री दोघा दांपत्यांमध्ये वाद झाले या वादातून संशयित पतीने पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला.त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो फरार झाला.पहाटे औरंगाबाद येथील वाळुंज पोलिस स्टेशन मध्ये तो स्वतः हजर झाला. येथील पोलिसांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.त्यानंतर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी मृत अवस्थेत अंबड पोलिसांना आढळून आली.
पोलिसांकडून मृतदेह शवविचछेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अंबड पोलिसांच्या पथकाने संशयिताला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले असून वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाबाबत अधिक तपास सुरू आहे.