नाशकात आईनेच केली मुलीची प्रसूती; धक्कादायक घटनेमुळे राज्य महिला आयोग संतप्त

नाशिक : त्रंबकेश्वर तालुक्यात बरड्याची वाडी येथील एक महिला प्रसूतीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे महिलेसोबत आलेल्या तिच्या आईलाच तिची प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक बाब घडली आहे. या आधी अशाच काही घटना नागपूर आणि कोल्हापूर येथे देखील झाल्या होत्या. दरम्यान या घटनांची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे.

या तिन्ही प्रकरणांमुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशा सूचना आरोग्य संचालकांना दिल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

बकेश्वर तालुक्यात बरड्याची वाडी येथील एक महिला प्रसूतीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे महिलेसोबत आलेल्या तिच्या आईलाच तिची प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक बाब घडली. नाशिक मध्ये घडलेल्या या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड्यावर आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आघाटे या गावाजवळ दहा ते पंधरा कुटुंबीयांची एक वस्ती आहे. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसूतीसाठी आई सोबत दाखल झाली. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर एकही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे प्रसूती वेदना वाढत असल्यामुळे सोबत आलेल्या आईने आणि आशा वर्करने प्रसुती करण्याचा ठरवलं. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. त्यानंतर गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे.

विशेष म्हणजे नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात खड्डेमय रस्त्यामुळे गर्भवती महिलेची प्रसुती रस्त्यावरच झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अशी घटना समोर आली. अशीच तिसरी घटना नागपूर मधून देखील समोर आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन गर्भवती मुलीने youtube वर पाहून स्वतःची प्रसूती केली. यात बाळाचा जीव गेला. यावर बोलताना महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या तिन्ही घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहे आणि या घटनांमुळे राज्यांमध्ये आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढसाळलेळी आहे, हे अधोरेखित होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित कराव्या अशा सूचना आरोग्य संचालकांना दिलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.