राज्यात नेमकं चाललंय काय? २५ हजार महिला, मुली गायब

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असून नाशकात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित करत पोलीस यंत्रणेला धारेवर धरले.

भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी म्हणाल्या कि, आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि मुख्यमंत्रीही गायब आहेत, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? गेल्या काही दिवसांत मुलीच्या गायब होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून राज्यात २५ हजार महिला, मुली गायब असल्याची धक्कादायक माहिती यावेळी त्यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=N_wmwKS8L84

तर चित्रा वाघ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथे भेट देत महिलांच्या पाण्याबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनतर पत्रकार परिषदेत म्हणाल्या कि, आता तिथे लोखंडी साकव बांधले असले, तरी तिथे पूल बांधण्याची गरज असून तो पूल बांधण्यात यावा अशी विनंती त्यांनी आदित्य ठाकरेंना केली आहे. शेंद्रीपाडा, सावरपाडा आणि परिसरातील आदिवासी महिला, बांधवांचे अन्य प्रश्नही सोडवण्याची गरज असून जिल्ह्यातील ५० टक्के आदिवासी बांधवाना खावटी योजनेने अनुदान मिळालेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर असून एकट्या नंदुरबार जिल्ह्यात 31 मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला आहे. या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सध्या सर्वचं घटकांमध्ये अस्वस्थता सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का? अशी शंका यावी अशी परिस्थिती गुंडांना, बलात्काऱ्यांना सरकारकडून अभय भाजपच्या लोकांवर गुन्हे दाखल होतात, गुंडांवर-बलात्काऱ्यांसाठी आयपीसी चे कलम नाही का? माझ्या पोलिटीकल करियरची कुणीही काळजी करू नये असेही त्या यावेळी म्हणाल्या.