Home » लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांकडून अटक

लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांकडून अटक

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

बेकायदशीररित्या तलवार बाळगणाऱ्या एकास नाशिकच्या गुन्हेशाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शेळके असे या तरुणांचे नाव आहे.

नाशिक पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आले असून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी चांगली पाऊले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीला भरारी पथकांसह गस्त वाढविण्यात येत आहेत. दरम्यान पंचवटी परिसरात गस्तीवर असताना पोलीस अंमलदार रविंद्र बागुल यांना गुप्त माहिती मिळाली कि, कुमावत नगर, पंचवटी येथे राहणारा इसम राहुल शेळके याने बेकायदेषीर रित्या एक तलवार आणलेली असुन, ती तलवार राहत्या घरात लपवून ठेवली आहे. बागुल यांनी तात्काळ हि माहिती वपोनि विजय ढमाळ यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलीप मोंढे, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, नाझीम पठाण हे पथक रवाना झाले.

मिळालेल्या माहितीनुसार हे पथक पंचवटी मधील कुमावत नगर येथे गेले असता बेकायदेषीर रित्या तलवार बाळगणारा राहुल शेळके यास ताब्यात घेतले. तसेच तलवारीबाबत विचारपूस केली असता, तलवार आणल्याचे कबुल करत पोलिसांना दिली.

दरम्यान या प्रकरणी शेळकेविरुध्द पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, वसंत मोरे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हेशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे व.पो.निरी. विजय ढमाळ, सपोनिरी. दिनेश खैरनार, पोउनि. विष्णू उगले, पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, दिलीप मोंढे, आसिफ तांबोळी, विषाल देवरे, नाझीम पठाण यांनी संयुक्तीक रित्या केली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!