Home » चित्र प्रदर्शनातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख

चित्र प्रदर्शनातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात १०० प्रतिभावान चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष विजयराज बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शेफाली भुजबळ, सचिन पाटील उपस्थित होते.

नाशिक मध्ये अनेक दिग्गज चित्रकारांची परंपरा लाभली असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिवंगत चित्रकार शिवाजीराव तुपे त्यांच्या स्मरणार्थ नाशिक मधील १०० चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या फार्मसी विभागात लावण्यात आले आहे.

या चित्रातून नाशिकच्या साहित्य, कला संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यत आले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!