टांझानियातील भाऊ-बहिणीच्या ‘राता लंबिया’ व्हिडिओने धुमाकूळ

नाशिक । प्रतिनिधी

सोशल मीडियावर कधी काय प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर प्रसिद्ध होण्यासाठी फक्त पैसे, ओळख, रंगरूप लागते असे मुळीच नाही.. तुमच्यातली कोणतीही कला तुम्हाला जगासमोर तुमचे अस्तित्व मिळवून देऊ शकते. फक्त तुम्हाला या जगासमोर तिला प्रामाणिकपणे मांडता आले पाहिजे. ‘किली पॉल’ हा त्यातलाच. आफ्रिका खंडातील टांझानिया चा एक सामान्य नागरिक मात्र एका हिंदी गाण्याने त्याने सर्व भारतीयांची माने जिंकून घेतली आहेत.

आयएएस सोनल गोयल यांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे.

टिकटॉकमुळे अनेक लोक प्रसिद्ध झाले. त्यांना भारतातच नाही तर जगभरात ओळख निर्माण झाली. असाच एक अवलिया सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तो आफ्रिका खंडातील टांझानिया येथील आहे. किली पॉल असे त्याचे नाव असून त्याने बॉलिवूडच्या गाण्यांवर लिप-सिंक करून भारतीयांची मने जिंकली आहेत. व्हिडिओ पाहते वेळी असं वाटतही नाही कि तो भारताबाहेरील असून एवढी सुंदर लिपसिंग करू शकतो. त्यासोबतच हा माणूस ते प्रत्येक गाणं तितकंच एन्जॉयही करतो. त्याची देहबोली, चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन आपल्याला ही सारखी जाणीव करून देत राहतात.

विशेष म्हणजे किली पॉल हे इंस्टाग्राम वर ०१ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. टिकटॉक नंतर त्याने इंस्टाग्रामवर आपले व्हिडीओ टाकण्यास सुरवात केली. नुकताच त्याने जुबिन नौटियाल याचा राता लंबिया हे गाण्याचा व्हिडिओ इंस्टग्रामवर टाकला असून अल्पावधीत तो व्हायरल झाला आहे. त्याच्यासोबत एक महिला देखील व्हिडीओ मध्ये पहायला मिळते. बघताक्षणी वाटेल कि त्याची प्रेयसी किंवा बायको वाटू शकेल. पण खरं तर ही नीमा आहे, त्याची सख्खी बहीण असून या दोघांची केमिस्ट्री सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घालते आहे. या दोघांच्या लिप-सिंक करण्याची अद्भुत प्रतिभेमुळे ते अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.