जसप्रीत बुमराह ठरला जगात ‘नंबर १’

By Pranita Borse

इंग्लंडमध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या वनडे मालिकेतील (England vs India ODI series) पहिल्या सामन्यात बुमराहच्या (Jaspreet Bumrah) चेंडूने कमाल केली. जसप्रीत बुमराने ओव्हल मैदानात (Oval stadium) खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात १९ धावा देऊन ६ गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकवले तर कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) धुवाधार फलंदाजीने यजमान हक्के-बक्के झाले.

मालिकेतील पाहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराच्या खेळीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मालिकेतील पाहिल्या सामन्यात ६ बळी घेत बुमराहने स्वतः चा ५ बळी घेण्याचा देखील रेकॉर्ड तोडला आहे. विशेष म्हणजे बुमराह इंग्लंडमध्ये ६ विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

बुमराहने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, लियाम लिविंगस्टोन, डेविड विली आणि ब्रायडन कार्स या ६ जणांना माघारी पाठवलं. यापेक्षाही अधिक उल्लेखनीय बाब म्हणजे बुमराहने रॉय, रुट आणि लिविंगस्टोन या तिघांना शून्यावरच पॅवेलियनमध्ये पाठवले. या कामगिरीमुळे बुमराहने तीन स्थानांची झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा ट्रेंड बोल्ट आणि पाकिस्तानचा शाहिन अफ्रिदीला मागे टाकत प्रथम स्थान पटकावलं आहे. ७१८ गुणांसह जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे आणि भारतासाठी गौरवाची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात जगातील नंबर-१चा गोलंदाज ठरला आहे.

टी-20 मध्ये सूर्यकुमारची मोठी झेप

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात शानदार शतक केलं. त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीतील हे पहिलं शतक होतं. या शानदार प्रदर्शनामुळे आयसीसीच्या रँकमध्ये तो ४४ स्थानावरून झेप घेऊन ५ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी केली होती. त्यात त्याने ५५ चेंडूंवर ११७ धावा केल्या होत्या. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे तो पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे.